संघर्षातून जीवन जगत असलेल्या स्त्रीची कहाणी दिनांक ११/२/२०२३ रोजी मी माझ्या आई-वडिलांसोबत गावाकडे गेले होते. रोजच्या धाकधूकीच्या जीवनातून वेगळा असा जरा आराम मिळण्याकरिता, आम्ही गावाकडे गेलो होतो. तेथे वडाच्या झाडांच्या बनात जेवण करण्याचा बेत आम्ही आखला होता. घरूनच आम्ही जेवण तयार करून घेतले होते त्यामध्ये बाजरीची भाकरी, वाटाण्याची उसळ, बटाटा रस्सा, चपाती व मुलांसाठी बेसन पोळी नेहमीप्रमाणे वाटेने जेवण करताना आम्हाला आवडणारा खास पदार्थ म्हणजे कांदा भजी सोबत घेतले होते. आम्ही जेव्हा गावी पोहोचलो तेव्हा दुपारचे एक वाजले असतील,इतरही मंडळी आपापल्या गाड्या घेऊन बनात जेवण करता आलेली होती. फक्त जेवणासाठीच नाही तर आमच्या गावातील प्रसिद्ध महादेवाच्या दर्शनासाठी व दर्शन झाल्यावर बनात येऊन सर्व जेवण करीत असत. आमचे ते खेडेगावच बर का पण महाशिवरात्री सोमवार व महादेवाच्या यात्रे दिवशी गावात खूप गर्दी परंतु इतर वारी सर्व काही सामसूम असे. ठराविक लोक दर्शनासाठी येत असत. आम्ही जेवण करण्यासाठी जमिनीवर चटई अंथरून त्यावर बसलो ,डबे उघडले ताट ...